एलएसीवर तिबेटी लोकांची नियुक्ती, काय आहे चीनची खेळी?
भारत आणि चीन दरम्यानच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) तैनात सैन्याला पाठबळ देण्यासाठी चीनने आता तिबेटी युवकांना सैन्यात भरती होणे अनिवार्य केले आहे. अलिकडेच १०० तिबेटी युवकांची एक तुकडी सिक्कीम जवळच्या चुंभी घाटीत तैनात करण्यात आली आहे. भारताविरोधात विशेष मोहीम आखण्याच्या दृष्टीने चिनी सैन्याकडून तिबेटी युवकांना सातत्याने प्रशिक्षण दिले जात आहे.…
