भारतीय सैन्याचा लाहोरला घेराव, का आणि कसा?
भारतीय लष्कराने 1971च्या युद्धात अवघ्या 13 दिवसांत पाकिस्तानचला दाती तृण धरायला लावले. पण पाकिस्तानची ही खुमखुमी 1947 साली त्याची निर्मिती झाली तेव्हापासूनच होती. 1965मध्ये झालेल्या युद्धात पाकिस्तानला भारतीय लष्कराने सहजरीत्या धोबीपछाड दिला. त्यांनी थेट लाहोरपर्यंत धडक दिली होती. पाकिस्तानच्या ते ध्यानीमनीही नव्हते. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूनंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान…
